Breaking News

पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे सापडले नव्या वादात

  पिंपरी-चिंचवड दि. 08, ऑगस्ट - कायम वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत येणार्‍या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर नितीन काळजे एका नव्या  वादात अडकले आहेत. पण हा वाद त्यांना कदाचित महापौर पदावरून पायउतार करणारा ठरू शकतो.
मोठा राजकीय दबाव आणत आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या गटाच्या नितीन काळजे यांना पिंपरीच्या महापौरपदावर बसवले. पण आता ते खोट्या जात  प्रमाणपत्राच्या वादात अडकलेत. काळजे यांनी सादर केलेले कुणबी जातीचं प्रमाणपत्र खोटं असल्याची तक्रार घनश्याम खेडेकर यांनी दाखल केली आहे.