Breaking News

मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी भायखळा कारागृहातील दोन वरिष्ठ अधिकार्‍यांना निलंबित करणार


मुंबई,दि.2 : मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी भायखळा तुरूंगाचे प्रभारी अधिक्षक तानाजी घरबुडवे आणि अधिक्षक चंद्रमणी इंदुलकर यांना निलंबित करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत केली. या प्रकरणी स्वाती साठ्ये यांच्यासह कारागृह अधिक्षकांची 15 दिवसांत चौकशी पूर्ण केली जाईल, असे आश्‍वासनही पाटील यांनी दिले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच, स्वाती साठ्ये यांच्या निलंबनाची मागणीही मुंडे यांनी केली आहे.