Breaking News

देशातील आर्थिक अडचणी पाहता खासदारांनी विशेषाधिकार सोडावेत : वरूण गांधी



नवी दिल्ली,दि.2 : सध्या देशाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता खासदारांनी कमीत कमी या संसदेच्या कार्यकाळापुरते आपले विशेषाधिकार सोडायला हवेत, असे मत भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी व्यक्त केला. अधिवेशनादरम्यान लोकसभेत शून्यप्रहरात त्यांनी याबाबत प्रश्‍न उपस्थित केला.
सध्या भारताची आर्थिक स्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत खासदारांचा स्वतःचे वेतन वाढवण्याचा अधिकार आपल्या लोकशाहीच्या नैतिकतेला अनुरूप नाही. या देशाचे भले करण्याची इच्छा असेल, तर या व्यवस्थेत बदल करून यासाठी खासदारांचा हस्तक्षेप नसलेली एखादी बाहेरची यंत्रणा तयार करणे आवश्यक आहे. तसेच, देशातील शेवटच्या व्यक्तीच्या, विशेषत: शेतकर्‍यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता खासदारांनी किमान संसदेच्या कार्यकाळापुरते आपले विशेषाधिकार सोडायला हवेत, असे वरूण गांधी म्हणाले. देशभरात शेतकर्‍यांच्या अडचणी आणि होत असलेल्या आत्महत्या यांच्या पार्श्‍वभूमीवर खासदारांना स्वतःचे वेतन वाढवून घेण्याचा अधिकार असता कामा नये, अशी मागणीही त्यांनी केली.