Breaking News

आमदार थोरातांच्या हस्ते दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती

अहमदनगर, दि. 31, ऑगस्ट - यावर्षी राज्यातील सर्व भागात चांगला पाऊस पडून शेतकरी सुख समाधानी व्हावे, सर्व जनतेस निरोगी आयुष्य व सुख समाधान  मिळावे, अशी प्रार्थना राज्याचे नेते माजी महसूलमंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचरणी केली आहे. यावेळी  त्यांच्यासमवेत त्यांच्या सुविद्य पत्नी  कांचन थोरात होत्या. गणेश मंडळाचे विविध पदाधिकारी, गणेश भक्त व कार्यकर्ते याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापवेळी बोलतांना आ. थोरात म्हणाले, गणपती हा विघ्नहर्ता आहे. प्रत्येकाच्या जीवनात येणार्या संकटापासून तो रक्षण करतो. राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे  मोठ्या संकटात आहे. यामुळे यावर्षी सर्वत्र भरपूर पाऊस व्हावा आणि राज्यातील शेतकरी सुखी, समाधानी व्हावा. तसेच विद्यार्थी, नागरीक, महिला, वयोवृध्द  सर्वांना चांगले आरोग्य मिळवून सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, अशी प्रार्थनाही आ. थोरात यांनी केली. यावेळी श्रीमंत दगडुशेठ हलवाई मंडळाच्यावतीने आ.  थोरात यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.