Breaking News

गणेशोत्सव माझ्या नजरेतून... नगरचा गणेशोत्सव कसा असावा?

अहमदनगर, दि. 31, ऑगस्ट - नगर हे ऐतिहासीक शहर आहे. या शहरात गणेशोत्सव साजरा करताना ऐतिहासीक, पौराणिक, अध्यात्मिक आणि सामाजिक  विषयावरील देखावे सादर करण्याची परंपरा पुर्वापार चालत आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करणारे लोकमान्य टिळक यांनी नगरच्या कापड बाजार लगतच्या  इमारत कंपनीमध्ये मस्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारचफ अशी जाहिर घोषणा केली होती. नगरच्या गणेशोत्सवामध्ये स्वातंत्र्यपूर्व  काळातील या ऐतिहासीक प्रसंगाचे लक्षवेधी देखावे असावेत. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान हाती घेतल्याने पंतप्रधानांना साथ देण्यासाठी  गणेशोत्सव मंडळांनी किमान आपल्या मंडळाच्या परिसरात सदोदीत स्वच्छता राहील याची काळजी डोळयात तेल घालून घेणे गरजेचे आहे. गणेशोत्सवामध्ये सध्याच्या  ज्वलंत प्रश्‍नांवर विचार मंथन होवून सामाजिक बांधीलकीच्या सद्भावनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे. या उत्सवातून गणरायाची आराधना करताना  मानवासमोरील आणि देशासमोरील सर्व विघ्नांचे निराकरण करण्याचा खास प्रयत्न व्हावा. नगरचा गणेशोत्सव मनगरीफ वेगळेपण दाखवून देणारा असावा.
श्री.शैलेश सुरेश मुनोत
व्हाईस चेअरमन - नगर अर्बन को.ऑप. बँक लि., अहमदनगर