Breaking News

पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

श्रीनगर, दि. 28, ऑगस्ट - पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांसह झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेऴी लष्कराचे  आणि पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य, मेजर जनरल बी.एस.राजू, पोलीस महानिरीक्षक सीआयडी  अब्दुस गनी मीर, मुनीर खान, हेडक्वॉर्टर सुरिंदर कुमार गुप्ता, वरिष्ठ पोलीस अधिक्षक अवंतीपोरा मोहम्मद जाहिद मलिक आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 130  व्या तुकडीचे कर्नल पुनीत खोलदार उपस्थित होते.