Breaking News

गायी चोरल्याच्या संशयावरून पश्‍चिम बंगालमध्ये दोन मुस्लिम तरूणांची हत्या

कोलकाता, दि. 28, ऑगस्ट - गायींची चोरी केल्याच्या संशयावरून पश्‍चिम बंगालमधील जलपायगुडी जिल्ह्यातील धुपगुरी गावाजवळ दोन मुस्लिम तरूणांना बेदम  मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. अन्वर हुसेन आणि हफीजुल शेख अशी हत्या झालेल्या तरूणांची नावे आहेत. हुसेन आणि शेख यांना रूग्णालयात  दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शेख हा आसाममधील धुबीग येथील रहिवासी आहे तर, हुसैन हा कूचबिहारमधील पटलाहावा येथील  रहिवाशी आहे. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती जलपायगुडी जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिली.
दोन दिवसांपूर्वीच अशीच घटना पश्‍चिम बंगालमधील दिनाजपूर भागात घडली असून तीन तरूणांना बेदम मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली.