Breaking News

हरियाणात उद्या शाळा-महाविद्यालये आणि इंटरनेट बंद राहणार

नवी दिल्ली, दि. 28, ऑगस्ट - डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा राम रहिम याला उद्या तुरुंगातच शिक्षा सुनावली जाणार आहे. याप्रकरणी सुरक्षेच्या दुष्टीकोनातून उद्या  हरियाणामध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच येथील इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. बाबा राम रहीमला कमीत कमी 7 वर्षांची  आणि जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षाहोईल अशी शक्यता कायदे तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.बाबा राम रहीमवरील बलात्काराचे आरोप सिद्ध झाल्हरियाणामध्ये  राम रहीमच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. त्यामुळे हरियाणा सरकारने उद्याच्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कडेकोट बंदोबस्त  ठेवला आहे. प्रतिबंधक उपाय म्हणून लष्कराच्या 28 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.