Breaking News

जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी ठार झाल्यानंतर पुलवामामध्ये बंद

जम्मू, दि. 28, ऑगस्ट - जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी ठार झाल्यानंतर पुलवामामध्ये बंद पुकारण्यात आला. यामुळे येथील परिसरातील दुकाने आणि  व्यावसायिक संस्था आज बंद ठेवण्यात आल्या. 
काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत शनिवारी जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार झाले होते. जैश-ए-मोहम्मदच्या तीन  दहशतवाद्यांनी शनिवारी पोलीस निवासस्थानावर हल्ला केला होता. यात केंद्रीय राखीव दलाचे चार जवान आणि चार पोलीस अधिकारी असे मिळून एकूण आठ जवान  शहीद झाले.