Breaking News

प्रभू रामचंद्राचे बाण एखाद्या क्षेपणास्त्राप्रमाणे शक्तीशाली - विजय रुपानी

गांधीनगर, दि. 28, ऑगस्ट - प्रभू रामचंद्राचे बाण एखाद्या क्षेपणास्त्राप्रमाणे शक्तीशाली होते. पायाभूत सुविधांच्या निर्मितीतीत व सामाजिक घडी बसवण्यातही रामाचे  योगदान मोठे होते, असे प्रतिपादन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केले आहे.
पायाभूत सुविधा तंत्रज्ञान संशोधन आणि व्यवस्थापन संस्थेच्या दीक्षांत सोहळ्यात अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांशी त्यांना संवाद साधला. इस्रो आज जे काम  करत आहे ते भगवान रामाने त्याकाळी केले होते. रामाने भारत व श्रीलंकेला जोडणारा पुल बांधला. आजही त्या पुलाचे अवशेष समुद्रात मिळत असल्याचे सांगितले  जाते. राम सेतू बांधणे ही रामाची कल्पना होती, असे ते म्हणाले.
पायाभूत सुविधांसह सामाजिक घडी बसवण्यातही प्रभू रामचंद्राचे योगदान मोलाचे होते. त्यांनी सर्व जाती-पंथाच्या घटकांना एकत्र आणणे, असेही ते म्हणाले. महात्मा  गांधी यांनीही रामराज्य येणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या धोरणांमधून पुन्हा रामराज्य आणण्यासाठीच प्रयत्न करत आहेत, असेही  ते म्हणाले.