Breaking News

विधानसभा पंचायतराज समितीवर आ.राहुल बोंद्रे

बुलडाणा, दि. 31, ऑगस्ट - महाराष्ट्र शासनाच्या विधानसभा अध्यक्षाकडून नियुक्त केल्या जाणार्‍या विविध समिती समिती प्रमुख व सदस्यांची नियुक्ती  विधानसभेचे अध्यक्ष नामदार हरीभाउ बागडे यांनी दिनांक 24 ऑगस्ट 2017 रोजी जाहीर केली असून त्या समित्यातील पंचायत राज समितीवर चिखली विधानसभा  मतदार संघाचे आ. राहुल बोंद्रे यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे चिखली विधानसभा क्षेत्रातील मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण  झाले आहे. 
आमदार राहुल बोंद्रे आपल्या चमकदार कामगिरीमुळे सर्व राज्याला सुपरीचीत झाले आहे. मागिल कार्यकाळातही त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या  रोजगार हमी योजना समितीवर प्रतिनिधीत्व मिळाले होते. त्यांच्या दुसर्‍या टर्ममध्येही त्यांची दखल घेत विधानसभा अध्यक्ष नामदार हरीभाउ बागडे यांनी विधानसभा  नियम 239 अन्वये नियुक्त केलेल्या पंचायत राज समितीवर त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. पंचायत राज समिती ही राज्यभर महत्वपुर्ण समजली जाते,  सदर समितीवर निवड झाल्यामुळे आता जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात अनेक महत्वाच्या निर्णयामध्ये आमदार राहुलभाउ बोंद्रे यांचा सहभाग असणार  आहे. त्यांच्या नियुक्तीचे परीपत्रक विधानसभेचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी दिनांक 24 ऑगस्ट रोजी सर्व संबंधीतांना पाठविले असून आमदार बोंद्रे यांच्या  नियुक्तीचे सर्व थरातून स्वागत होते आहे.