Breaking News

श्‍वेता महाले यांच्या पुढाकारातून कर्जमाफीचे अर्ज भरण्यास शुभारंभ

बुलडाणा, दि. 31, ऑगस्ट -  महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक अशी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. या योजनेतंर्गत शेतकरी  बांधवांना कर्जमाफी मिळणार आहे. या योजनेचा एक भाग म्हणून आँनलाईन अर्ज भरण्याचे काम सध्या युध्द पातळीवर सुरू आहे. हे काम जलद गतीने व्हावे व  जास्तीत जास्त गरजू शेतकरी बांधवांना सदर योजनेद्वारे कर्जमाफी मिळावी यासाठी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्या व बुलडाणा जिल्हा परिषदेच्या महिला व  बालकल्याण सभापती श्‍वेताताई महाले पाटील सतत प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या पुढाकारातून व भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून चिखली तालुक्यातील मौजे   उंद्री आणि भरोसा-भोरशी  येथे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या उपक्रमाचा 29 ऑगस्ट रोजी शुभारंभ झाला.
थकबाकीदार शेतकर्‍यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा, कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी कसलीही अडचण येऊ नये या करीता सदर  उपक्रमाद्वारे थकबाकीदार  शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरून घेण्यात आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडुन या योजनेविषयी शेतकरी बांधवांमध्ये संभ्रम पसरवला जात  आहे. केवळ राजकीय हेतूने विरोधक अपप्रचार करीत आहेत. या अपप्रचाराला बळी पडून शेतकर्‍यांनी आपल्या हक्काच्या कर्जमाफीपासून वंचित राहू नये यासाठी हा  उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या संबंधी शेतकर्‍यांचे प्रबोधन करून त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी कर्जमाफी मेळावे देखील आयोजित करण्यात येत आहेत  अशी माहिती आयोजकांच्या वतीने उपस्थित शेतकर्‍यांना देण्यात आली. कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सरळ-सोपी असून त्यासाठी मोठ्या  संख्येने ई सुविधा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. 15 सप्टेंबरपर्यत सदर योजनेची मुदत असून तो पर्यत अधिकाधिक संख्येने आपले अर्ज सादर करावे, असे  आवाहन यावेळी करण्यात आले. शेतकरी बांधवांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र कलंत्री, भाजपा तालुका उपाध्यक्ष महादेव ठाकरे, गजानन पाटील, युवा मोर्चा जिल्हा विक्की हरपाळे, सचिव अनमोल  ढोरे, माजी पंचायत समिती सदस्य संजय महाले, डिगांबर राऊत, प्रल्हाद परसोडे, राजेश आकाळ, गोपाल उरसाल, संतोष आकाळ, शेख बब्बू, दीपक मिरकुटे,  विठ्ठल भूसारी, पांडुरंग आकाळ, श्याम पंडीत, अण्णा गवई, शेख वजीरभाई, शब्बिरखा पठाण व अनिल आकाळ यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रत्ते तसेच  गावकरी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.