Breaking News

राजीव गाबा यांनी केंद्रीय गृह सचिव पदाची सुत्रे स्विकारली

नवी दिल्ली, दि. 31, ऑगस्ट - वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी राजीव गाबा यांनी गुरूवारी केंद्रीय गृह सचिव पदाची सुत्रे स्विकारली. मंत्रालयाकडून जारी करण्यात  आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, गाबा हे 1982च्या झारखंड तुकडीतील अधिकारी आहेत. 27 जून ते केंद्रीय गृह मंत्रालयात विशेष अधिकारी म्हणून रुजू  झाले.आज त्यांनी केंद्रीय गृह सचिव पदाची सुत्रे स्विकारली.
राजीव महर्षि यांच्या जागी आता गाबा हे काम पाहणार आहेत. यापूर्वी ते शहर विकास मंत्रालयाचे सचिव होते. गाबा यांनी यापूर्वी केंद्र व राज्य सरकारमध्ये वरिष्ठ पद  भूषवली आहेत. झारखंडच्या मुख्य सचिव पदा व्यतिरिक्त केंद्र सरकारमधील, गृह, संरक्षण, पर्यावरण, वन मंत्रालय व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान  मंत्रालयातील काम त्यांनी पाहिले आहे.