Breaking News

काळा पैसा कुठे गेला, रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनंतर काँग्रेसचा सरकारला सवाल

नवी दिल्ली, दि. 31, ऑगस्ट - ज्या काळ्या पैशाला हद्दपार करण्यासाठी नोटारद्दचा निर्णय घेण्यात आला. तो काळा पैसा कुठे गेला, असा सवाल काँग्रेसकडून  करण्यात आला आहे. 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 लाख कोटी काळा पैसा बाहेर आल्याचे म्हटले होते. पंतप्रधानांची आकडेवारी चुकीची असून  त्यांनी आपली चुक स्विकारून माफी मागायला हवी, असे काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी म्हटले.
नोटारद्दच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनंतर काँग्रेसकडून ही टीका करण्यात आली आहे. देशात 96 टक्के रोखविरहीत व्यवहार केला जातो.  सरकारने दावा केला होता की, 15 लाख 28 हजार नोटा परत आल्या. रिझर्व्ह बॅकेने म्हटले होते की, केवळ 41 कोटी बनावट नोटा आहेत. इतक्यासाठी भारतात  आर्थिक अराजकता पसरवण्यात आली. सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दरही या निर्णयामुळे घसरला. हा पंतप्रधानांचा वैयक्तिक निर्णय होता, अशी टीकाही त्यांनी केली.