Breaking News

नोएडा घोटाळाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून सक्तवसूली संचालनालयास नोटीस

नवी दिल्ली, दि. 31, ऑगस्ट - नोएडा घोटाळाप्रकरणी यादव सिंग यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसूली संचालनालयास नोटीस बजावून दोन  आठवड्यात उत्तर मागितले आहे.
यादव यांनी सांगितले की, याप्रकरणी 60 दिवसात सक्तवसूली संचालनालयाकडून माझ्याविरोधात आरोप पत्र दाखल करण्यात आले नव्हते. 29 एप्रिल रोजी 60  दिवस पूर्ण झाले. त्यानंतर 1 मे रोजी मी उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली. सक्तवसूली संचालनालयाने 2 मे रोजी आरोप पत्र दाखल केले. त्यामुळे  कायद्यानुसार 60 दिवसांमध्ये आरोप पत्र दाखल न केल्यास जामीन दिला जातो. मात्र, याप्रकरणी न्यायालयाने जामीन मंजूर केला नाही, असे सिंग यांनी याचिकेत  म्हटले आहे. यादव यांनी आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी संजय दत्त यांच्यासह अनेकांची उदाहरणे दिली होती. यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने लखनौ पीठाने  याचिका फेटाळली. लखनौ तुरूंगात असलेल्या यादव यांनी सक्तवसूली संचालनालयाने याप्रकरणी जामीन याचिका दाखल केली होती.