Breaking News

राम रहिम दहशतवाद्यांपेक्षाही जास्त धोकादायक - तरूण सागर

जयपूर, दि. 28, ऑगस्ट - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहिम दहशतवाद्यांपेक्षाही जास्त धोकादायक आहे, अशी प्रतिक्रिया प्रवचनकार जैन मुनी तरूण  सागर यांनी व्यक्त केली. स्वत:ला संत किंवा बाबा म्हणणारे राम रहिम यांच्यासारखे लोक लोकांच्या श्रद्धेची हत्या करतात. त्यामुळे अशी लोक कुख्यात दहशतवादी  ओसामा बिन लादेनपेक्षा जास्त धोकादायक आहेत,असेही तरूण सागर यांनी नमूद केले.
न्यायालय आणि कायदा आपले काम चांगल्या प्रकारे करत आहे. त्यामुळे सगळ्यांनी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करायाला हवा, असेही तरूण सागर  म्हणाले.