Breaking News

सिंधूची झुंज अयशस्वी; जपानची ओकुहरा विजेती

ग्लास्गो, दि. 28, ऑगस्ट - भारताच्या पी. व्ही. सिंधुची निकराची झुंज अशस्वी ठरवत जपानच्या नोझोमी ओकुहरा हिने जागतिक बॅटमिंटन स्पर्धेचे विजेतेपद  पटकावले. नोझोमी हिने सिंधूचा 19-21, 22-20, 20-22 असा पराभव केला. सामन्याचा पहिला गेम नोझोमी हिने घेतला. मात्र दुस-या गेममध्ये सिंधु हिने  पारडे पटवले आणि 22-20 अशी बाजी मारली. तिस-या आणि निर्णायक गेममध्ये नोझोमी हिने चिवट खेळाचे प्रदर्शन घडवत सामना खिशात घातला. नोझोमीने  काल सायना नेहवालचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.