Breaking News

अश्‍विनी लोहानी यांची रेल्वे मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

नवी दिल्ली, दि. 24, ऑगस्ट - एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अश्‍विनी लोहानी यांची रेल्वे मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.  एकामागोमाग झालेल्या दोन मोठ्या रेल्वे अपघातामुळे आज रेल्वे मंडळाचे अध्यक्ष ए.के.मित्तल यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला.  याप्रकरणाची जबाबदारी स्वीकारत आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनीही पदाचा राजीनामा दिला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा राजीनामा फेटाळला आहे.
दरम्यान, ए. के. मित्तल हे 2016 मध्ये निवृत्त होणार होते. मात्र त्यांना मोदी सरकारकडून दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. यानुसार ते 31 जुलै 2018  पर्यंत पदभार सांभाळणार होते.