सुरेश प्रभू यांचा राजीनामा स्वीकारण्यास पंतप्रधानांचा नकार
नवी दिल्ली, दि. 24, ऑगस्ट - एकाच आठवड्यात झालेल्या उत्कल एक्सप्रेस आणि कैफियत एक्सप्रेस या दोन रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारुन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत राजीनामा देण्याची तयारी दर्शविली, मात्र पंतप्रधान मोदी यांनी प्रभू यांना वाट पाहण्याचा सल्ला दिला. प्रभू यांनी स्वत:च ट्विटरच्या माध्यमातून या संदर्भातील माहिती दिली.
काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी वाढत्या रेल्वे अपघातांमुळे प्रभू यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानुसार, ‘मी या अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली मी रेल्वेच्या विकासासाठी सुमारे तीन वर्षे कार्यरत आहे. या काळात रेल्वेच्या विकासाच्या दृष्टीने अनेक निर्णय घेण्यात आले. परंतु, झालेल्या रेल्वे दुर्घटना वेदनादायी आणि दुर्दैवी आहेत. या अपघातांमध्ये काहींना आपला जीव गमावावा लागला, याचे मला दु:ख आहे आणि म्हणूनच मी पंतप्रधानांची भेट घेतली. मात्र, त्यांनी मला सबुरीचा सल्ला दिला आहे, असे ट्विट प्रभू यांनी केले आहे.