Breaking News

नोंदणी केलेल्या ग्राहकांना सदनिका न दिल्याने बिल्डरविरोधात गुन्हा दाखल


औरंगाबाद, दि.30 ः घरासाठी नोंदणी केलेल्या ग्राहकांना वेळेवर सदनिका न दिल्याने आर.के. कन्स्ट्रक्शन कंपनीचे समीर मेहता यांच्या विरोधात अर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदविला आहे. काल रात्री त्यांची कसून चौकशी करण्यात आली. आर.के. कन्स्ट्रक्शन यांनी जालना रोडवर केंब्रिज स्कूल जवळ 472 सदनिकेचे बांधकाम सुरू केलेे. त्यात नोंदणी करणार्याना 18 महिन्यात सदनिकेचा ताबा देण्यात येईल असे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र बिल्डरने या कामासाठी नोंदणीत जमा झालेला पैसा अन्यत्र वळविला आणि या कामाची पूर्तता वेळेत केली नाही. यामुळे झालेल्या ग्राहकांच्या तक्रारीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने बिल्डर लॉबीत खळबळ उडाली आहे.