Breaking News

समृद्धी मार्गाच्या भूसंपादनाचा मार्ग पुढील महिन्यात मोकळा होण्याची शक्यता


औरंगाबाद, दि.30 : काही दिवसांपासून नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाची प्रक्रिया कर्जमाफीसह काही मुद्द्यांच्या अनुषंगाने रखडली आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने नुकत्याच काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळे औरंगाबाद तालुक्यातील 14 गावांचा अंतिम मोजणी अहवाल आगामी तीन दिवसांत प्राप्त होणार आहे. यानंतर सप्टेंबरमध्ये रजिस्ट्रीचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शशिकांत हतगल यांनी दिली. सोमवारी (दि.28) त्यांनी तालुक्यातील संबंधित गावांचा आढावा घेण्यासाठी अधिकार्यांची बैठक घेतली. कर्जमाफीच्या अनुषंगाने राज्य रस्ते विकास महामंडळाने नुकत्याच जिल्हाधिकार्यांना काही सूचना केल्या आहेत. यात शेतकर्यांच्या जमिनीवरील कर्जाची रक्कम शिल्लक ठेवत उर्वरित रक्कम संबंधितांना देत जमिनीचे संपादन करण्याचे सांगितले आहे. यामुळे समृद्धी महामार्गाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सोमवारी दोन शेतकर्यांकडून रजिस्ट्री करून घेण्यात आल्याचे शशिकांत हतगल म्हणाले. समृद्धी महामार्गात औरंगाबाद तालुक्यातील सर्वाधिक 36 गावांचा समावेश आहे. सध्या जमिनीचे प्रकार ठरविण्याचे काम सुरू आहे.