Breaking News

बसची मोटारसायकलला धडक; दोन ठार


उस्मानाबाद, दि.30 : उमरग्याजवळ मुरूम आष्टा कासार रस्त्यावर एसटी बसने मोटारसायकला दिलेल्या जोरदार धडकेत दोन जण जागीच ठार झाले. याबाबत अधिक माहिती अशी की एसटीने दिलेल्या या धडकेमध्ये संभाजी बोंदर (रा. उस्मानाबाद )आणि अब्दुल महंमद रनाटे (रा.मुरूम ता. उमरगा) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही मुरूम पोलिस ठाण्यात कार्यरत होते. मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. मुरूम पोलिस ठाण्यात चौकशी केली असता उशीरापर्यंत याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.