Breaking News

शिवसेनेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा : खा. प्रतापराव जाधव

बुलडाणा, दि. 29 - ग्रामीण भागासह शहरी भागाच्या विकासाचा आराखडा मांडणे आणि नव्या विकासवाटा निर्माण करण्याचे महत्वपूर्ण काम जिल्हा नियोजन समितीच्या वतीने केले जाते. शिवसेनेच्या नवनिवार्चीत जिल्हा नियोजनच्या सदस्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी अभ्यासपूर्ण पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा संपर्कप्रमुख खा. प्रतापराव जाधव यांनी केले. 
जिल्हा शिवसेनेच्या वतीने 24 ऑगस्ट रोजी अविरोध झालेल्या आणि निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनेच्या जिल्हा नियोजन समिती सदस्यांचा खा. प्रतापराव जाधव यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आ. श्रीकांत देशपांडे, आ. डॉ. संजय रायमूलकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, किसान सेना उप जिल्हाप्रमुख लखन गाडेकर, मोताळा तालुकाप्रमुख भोजराज पाटील, जि. प. सदस्य आशिष रहाटे, सुरेश वाळुकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा नियोजन समितीचे नवनिवार्चीत सदस्य राजेंद्र पळसकर, सौ. पुष्पाताई धुड, नंदन खेडेकर, शरद हाडे, सौ. कमलताई बुधवत, सौ. शिलाताई शिंपणे, सौ. रेणुकाताई वाघ यांचा सत्कार करणत आला. कार्यक्रमाला सेवानिृत्त कार्यकारी अभियंता धनशिराम शिंपणे, बबनराव भोसले, राजू मुळे, कांता पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.शिवसेनेच्या जिल्हा नियोजन समितीमध्ये अविरोध तसेच मतदानातून विजयी झालेल्या सदस्यांचा सत्कार करताना खा. प्रतापराव जाधव, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, आदींस अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.