Breaking News

ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षकांनी परिपक्वता दाखवल्यास गुणवत्तेत वाढ होईल : डॉ.राजेंद्र शिंगणे

बुलडाणा, दि. 29 - आजच्या शिक्षणाच्या स्पर्धेत संगणकाची भर पडली असून शहरी भागात विद्यार्थ्यांना शाळांमध्ये संगणक शिक्षण देण्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध आहे. परंतु ग्रामीण भागातील शिक्षणाचा मूळ पाया मजबूत होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षण घेताना ई-लनिर्ंगच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिक्षकांनी परिपक्वता दाखवल्यास गुणवत्तेत वाढ होईल,असे प्रतिपादन माजी आरोग्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी तालुक्यातील डिग्रस बु.येथील जिल्हा परिषद मराठी व जिल्हा परिषद उर्दू शाळा पाच वर्ग खोल्यांच्या ई-लनिर्ंग उदघाटनाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. 
या कार्यक्रमाच्या उद्घाटक देऊळगांवराजा पंचायत समिती सभापती रजनीताई चित्ते होत्या. तर प्रमुख अथिती म्हणून जिल्हा परिषद सदस्य मनोज कांयदे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नितीन शिंगणे, गटविकास अधिकारी आशीष पवार, गटशिक्षण अधिकारी शिवलाल पवार, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शेळके पाटील, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष भिकाजी शिंगणे, सरपंच सय्यद बेबी सय्यद लतीफ, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजीव शिरसाट, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समाधान पर्हाड, शेख रहेमान, माजी सभापती तुकाराम खांडेभराड, राजू चित्ते, बि.एम. पठाण, रंगनाथ कोल्हे, सिद्दीक कुरैशी, राष्ट्रवादी युवा नेते समाधान शिंगणे, गणेश बुरूकुल, प्रा.सदाशिव मुंढे, लक्षमण पर्हाड, विनायक पाटील, गजानन चेके, उद्वव पाटील ग्रामसेवक लता अरबडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पुढे बोलतांना डॉ. शिंगणे म्हणाले की,मी शिक्षण मंत्री असतांना विविध योजनेअंतर्गत सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना लाभ पोहोचविण्याचे काम केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात कोणत्याही प्रकारे अडीअडचणी निर्माण होऊ नये यासाठी वेळोवेळी सकारत्मक पाऊले उचलले, असे त्यांनी यावेळी सांगितले.
सदर ई-लर्निगचे दर्जेदार साहित्य चौदा वित्त आयोगतुन व लोकवर्गणीतुन खरेदी करण्यात आले. ज्या ग्रामस्थांनी शाळेकरिता लोकवर्गणी दिली अश्या ग्रामस्थांचा मोठया उत्साहात सत्कार देखील डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कुण्डलिक(भट्टू) पाटिल यांनी केले. तर सूत्रसंचालन केंद्रप्रमुख गणेश पर्हाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद यांनी पर्शिम घेतले. याठिकाणी गावातील असंख्य नागरिक व महिला, विद्यार्थी उपस्थित होते.