Breaking News

मराठा क्रांती मोर्चासाठी मुंबई सज्ज; तयारीला वेग

मुंबई, दि. 08, ऑगस्ट - बुधवार 9 ऑगस्ट रोजी मुंबईत होणा-या मराठा क्रांती मोर्चासाठी मुंबई सज्ज झाली आहे. या भव्य मोर्चासाठी मराठा संघटनांकडून जोरदार  तयारी सुरु करण्यात आली आहे. शिवाजी पार्कमध्ये सर्व मराठा संघटनांची व्यवस्थापकीय समिती कार्यरत आहे. म मराठा मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये,  याची विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे या समितीकडून सांगण्यात आले आहे. या मोर्चात किमान 25 लाखांचा सहभाग असेल असे सांगितले जात आहे . 
या मैदानावर आझाद मैदानावर नागरिकांची गर्दी झाल्यास बॉम्बे जिमखान्याचा मैदान खुले केले जाणार आहे. तसेच कोल्हापूर-मुंबईच्या रेल्वे डब्यामध्ये वाढ करण्यात  आली आहे. अन्य राज्यांमध्ये झालेल्या मोर्चांच्या तुलनेत मुंबईतील मोर्चा सर्वात मोठा असणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मोर्चासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवरील दादर फायर ब्रिगेड जंक्शन ते जेजे फ्लायओव्हरपर्यंतचा मार्ग, जे.जे. फ्लायओव्हरवरून दोन्ही बाजूनी येणारी-जाणार्‍या  मार्गिका आणि कर्नाक बंदर ते कर्नाक ब्रिजकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंदठेवण्यात येणार आहे.
हा मोर्चा उद्या सकाळी 11 वाजता भायखळ्यातील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे. यातठाणे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली,  औरंगाबाद, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यातला मराठा बांधव सहभागी होणार आहेत.