Breaking News

नेपाळचे पंतप्रधान देउबा 23 ऑगस्टपासून भारत दौ-यावर

काठमांडू, दि. 08, ऑगस्ट - नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा हे पहिल्या विदेशी दौ-यांतर्गत या महिन्यात भारतात येत आहेत. देउबा यांचा दौरा 23  ऑगस्टपासून सुरू होणार आहे, अशी माहिती उपपंतप्रधान व परराष्ट्र मंत्री कृष्ण बहादुर महारा यांनी दिली.
देउबा यांच्या भारत दौ-याआधी चीनचे उपपंतप्रधान वांग यांग नेपाळचा दौरा करणार आहेत . भूकंपानंतर सुरू असलेल्या पुनर्उभारणीच्या कामावर चर्चा होणार आहे. भारत व चीन यांच्याबरोबर नेपाळ शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातून सहकार्य ठेवू इच्छीत आहे, असेही महारा यांनी सांगितले.