Breaking News

बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी इमारत स्फोटकांनी उडवून दिली

पाटणा, दि. 08, ऑगस्ट - बिहारमधील गया जिल्ह्यातील एक इमारत नक्षलवाद्यांनी स्फोटकांनी उडवून दिली. या घटनेत अद्यापही कुठीलीही जीवित हानी झाल्याचे  वृत्त नाही. या इमारतीचा वापर सामुदायिक कार्यासाठी केला जात होता. 
धनगाई गावात ही घटना घडली. नक्षलवाद्यांनी डायनामाईट्स ही समुदाय इमारत स्फोटकांच्या मदतीने उडवून दिली, अशी माहिती एका पोलीस अधिका-याने दिली  आहे. या घटनेनंतर नक्षलवाद्यांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, अशी माहिती बाराचट्टी पोलीस  ठाण्याचे प्रभारी विपिन कुमार यांनी दिली.