अल्पवयीन मुलीस मारहाणप्रकरणी आई, मामांविरोधात गुन्हा दाखल
सातारा, दि. 22, ऑगस्ट - पुसेसावळी ता.खटाव येथील अल्पवयीन मुलीस मारहाण व छळवणूक प्रकरणी मुलीची आई व दोन मामांविरोधात औंध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत औंध पोलीस ठाण्यामधून मिळालेली अधिक माहिती अशी, 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता संबंधित अल्पवयीन मुलगी घरामध्ये झाडलोट करीत असताना तिचा छोटा भाऊ घरात खेळू लागला त्यावेळी त्यास घरात खेळू नको असे तिने सांगितले असता त्यावेळी त्याठिकाणी त्या अल्पवयीन मुलीची आई पुष्पा त्याठिकाणी आली व मुलीस टोचून बोलू लागली. काम करायचे नाही म्हणून कारणे शोधू नकोस असे म्हणून त्यामुलीला मारहाण केली व लज्जा उत्पन्न होईल अशी शिवीगाळ केली. संबंधित अल्पवयीन मुलगी व तिच्या लहान बहिणीलाही पुष्पा राजमाने त्रास देत असल्याचे फिर्यादीत नमूद केला आहे. त्यानंतर ही बाब मुलीचे वडील धनाजी राजमाने यांनी मुलीचे मामा आनंद औंधे व जालिंदर औंधे रा.वांगी ता.कडेगाव यांच्या कानावर घातली त्यानंतर दोन्ही मामा पुसेसावळी येथे आले.त्यांना सर्व होणा-या त्रासाची माहिती देऊन ही त्यांनी आपली बाजू न घेता वडिलांकडे भांडणे मिटविण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केली वडिलांकडे पैसे नसल्याने दोन्ही मामा आनंद औंधे व जालिंदर औंधे यांनी वडिलांना लाथाबुक्यांनी मारहाण, शिवीगाळ केली. वारंवार होणा-या मानसिक त्रासाला कंटाळून संबंधित अल्पवयीन मुलीने वरील तिघांविरोधात औंध पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार फिरोज मुल्ला करीत आहेत.