गणेशभक्तांना ’इथे’ मिळणार टोलमाफीसाठी पास
मुंबई, दि. 22, ऑगस्ट - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई-गोवा महामार्गावरुन कोकणात जाणार्या गाड्यांना टोलमाफी करण्यात आली आहे.गणेशोत्सवादरम्यान टोलमूळे या महामार्गावर वाहतूककोंडी होत असते. हे टाळण्यासाठी टोलमाफी देण्यात आली आहे. ही टोलमाफी मिळण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन पाससाठी माहिती द्यावी लागणार आहे.
या टोलमाफीसाठी नागरिकांनी आपले नाव, वाहनाचे नाव, कोठे जाणार त्या गावाचे नाव आदी माहिती जवळच्या पोलीस स्थानकात द्यावी असे आवाहन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी रायगडमध्ये जाणार्यांनी द्रुतगती मार्गे खोपोली, पाली मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरीत जाणार्यांनी कराड-चिपळूण मार्गाचा, सिंधुदुर्गला जाणार्यांनी कोल्हापूर, गगनबावडा मार्गे, सावंतवाडीला जाणार्यांनी निपाणी, आंबोली घाटमार्गाचा वापर करावा.