Breaking News

जैन मंदिरातील पंचधातूच्या मूर्तींची चोरी

औरंगाबाद, दि. 29, ऑगस्ट - गंगापूर शहरातील प्रसिद्ध जैन चौकात असलेल्या जैन मंदीरात असलेल्या पंचधातुच्या पार्श्‍वनाथ भगवान, मुनीश्‍वरनाथ आणि आदीनाथ  भगवान या तीन मुर्ती चोरीला गेल्याने शहरात एकच खळबख उडाली आहे. या मूर्ती पंचधातूच्या 9 किलो 800 ग्रॅम वजनाच्या आहेत. चोरटयांनी मुर्तींबरोबर  दानपेटीवरही हात साफ केली असून मूर्ती व दानपेटीतील रक्कम मिळून ही चोरी 5 लाख 60 हजारांची असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. चोरटयांनी गंगापूर शहरात  धुमाकुळ घातला. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन तपास सुरु केला आहे. या चोरटयांनी शहरातील व्यापारी  संजय लाहोटी यांचे किराणा दुकान तसेच अरूण पदे यांचे कापड दुकानाला आपले लक्ष्य केले. चोरीच्या घटनेने संपुर्ण शहरात एकच खळबळ माजली आहे. पोलिीस  निरिक्षक मुकुंद अघाव यांनी चोरीच्या ठिकाणी पाहणी केली आहे.