Breaking News

मुंबईत पुन्हा इमातर कोसळली

मुंबई, दि. 31, ऑगस्ट - मुंबईतील भेंडीबाजार भागात पाकमोडिया स्ट्रीटवर असलेली हुसैनीवाला बिल्डिंग ही पाचमजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत चौघा जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी आहेत. पाच ते सहा जणांना इमारतीच्या ढिगार्‍याखालून बाहेर काढण्यात आलं असून 30 ते 35 रहिवासी अडकल्याची भीती आहे.
मुंबईतील भेंडीबाजार भागात पाकमोडिया स्ट्रीटवर हुसैनीवाला ही सुमारे सव्वाशे वर्ष जुनी इमारत होती. मूळ तीनमजली असलेल्या इमारतीवर दोन मजले नंतर बांधण्यात आले होते. गुरुवारी सकाळी आठ-साडेआठच्या दरम्यान ही इमारत कोसळल्याची माहिती आहे. इमारतीत 12 खोल्या आणि सहा गोदामं असल्याचं भाजपचे स्थानिक नगरसेवक अतुल शाह यांनी सांगितलं आहे. इमारतीत 9 कुटुंब राहत होती. मात्र शंभर जण इमारतीत वास्तव्याला असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.