Breaking News

लॉयन्स क्लबच्या वतीने रक्तदान शिबीर

बुलडाणा, दि. 31, ऑगस्ट - नगर परिषद लॉयन्स आय हॉस्पीटल येथे लॉयन्स क्लब व लियो क्लबच्या वतीने 25 ऑगस्ट रोजी पर्यावरण पुरक संदेश देणार्‍या  गणेशमुर्तीची स्थापना करण्यात आली असून सोबतच पर्यावरणाशी निगडीत पर्यावरण संदेश देणारा देखावा तयार करण्यात आला आहे. गणेशोत्सवानिमित्त विविध  प्रकल्प सुध्दा राबविण्यात येत असुन 27 ऑगस्ट रोजी लियो क्लबच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान  शिबीराला माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, लॉयन्स अध्यक्ष उज्वल गोयनका, सचिव अभय अग्रवाल, काँग्रेस नेते विश्‍वपालसिंह जाधव यांची प्रमुख  उपस्थिती होती.
या रक्तदान शिबीरात लॉयन्स क्लब सदस्य तथा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनीही रक्तदान केले. तसेच लियो अमित शर्मा, स्वराज पाटील, रवी  जांगीड, निखील लाठे, लियो अध्यक्षा पुजा अग्रवाल, सचिव सुजितसिंग चव्हाण, कोषाध्यक्ष वैष्णवी जोशीसह लियो क्लबच्या सदस्यांसह एकुण 18 जणांनी या  शिबीरात रक्तदान केले. संपुर्ण गणेशोत्सवादरम्यान लॉयन्स क्लब व लियो क्लबच्या वतीने गौसेवा, अन्नदान, महिला सशक्तीकरण शिबीर, नेत्र तपासणी शिबीर इत्यादी  प्रकल्प घेण्यात येणार आहे. या शिबीराचा नागरिकांनी मोठया संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन लॉयन्स क्लब व लियो क्लबच्या वतीने करण्यात आले.