टाटा पॉवर तर्फे इलेक्ट्रीक वाहनांसाठी विकोळीत पहिली चार्जिंग यंत्रणा कार्यान्वित
मुंबई, दि. 22, ऑगस्ट - टाटा पॉवर कंपनीकडून मुंबईतील विक्रोली भागात इलेक्ट्रीक वाहनांसाठी पहिली वहिली चार्जिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अशा प्रकारे अधिकाधिक ठिकाणी यंत्रे बसवण्याचे काम कंपनीकडून सुरू आहे. या माध्यमातून लोकांना इलेक्ट्रीक वाहन वापरण्यास प्रोत्साहन देण्याबरोबरच भविष्यातील अद्ययावतेसाठी तयार होण्यास मदत होणार आहे, असे कंपनीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. स्मार्ट चार्जिंग यंत्रातून देशात 2030 पर्यंत इलेक्ट्रीक वाहने वापरास मदत होणार आहे.
इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग यंत्रणा कार्यान्वित करून आनंद होत असून आमच्यासाठी ही गौरवास्पद बाब आहे. टाटा पॉवरच्या ग्राहकांना ऊर्जा बचतीची सुविधा उपलब्ध करणे आणि अभिनव तंत्रज्ञानाद्वारे सर्वसमावेशक यंत्रणा आत्मसात करण्याच्या दिशेने आम्ही कटीबद्ध आहोत, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक अनिल सरदाना यांनी सांगितले.