Breaking News

कर्नल पुरोहितांविरोधात मजबूत पुरावे असताना त्यांना जामीन मिळतोच कसा - ओवैसी

हैदराबाद, दि. 22, ऑगस्ट - मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याविरुद्ध भक्कम पुरावे असताना त्यांना जामीन कसा मिळू शकतो,  असा सवाल एमआयएम चे प्रमुख खा. असादुद्दीन ओवैसी यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. दहशतवादा संदर्भातील खटल्यात आरोपी असलेल्या  हिंदूंबाबत मोदी सरकारचे धोरण मवाळ बनल्याचा आरोपही ओवैसी यांनी केला. 
खा. ओवैसी म्हणाले की , दहशतवादाकडे धार्मिक चष्म्यातून पाहिले जाऊ नये . दहशतवादी हा कोणत्याही धर्माचा नसतो . मात्र मोदी सरकार सत्तेवर  आल्यापासून दहशतवादा संदर्भातील खटल्यात आरोपी असलेल्या हिंदूंबाबत मवाळ दृष्टीकोन स्वीकारला जात असल्याचे दिसते आहे . अनेक हिंदू  आरोपिंवरील खटले मोदी सरकारकडून मागे घेतले जात आहेत. जामीन मिळण्याचा हक्क देशाच्या प्रत्येक नागरिकाला आहे . मात्र फक्त हिंदू आरोपींनाच  जामीन मिळतो आहे . मुसलीम ,दलित , आदिवासी आरोपींना जामीन मिळू शकत नाही , असेही ते म्हणाले.