Breaking News

मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी बोलावली आपत्कालीन बैठक

चंदीगड, दि. 29, ऑगस्ट - बलात्कार प्रकरणी गुरमित राम रहीम यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर हरियणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राज्यातील  वरिष्ठ अधिका-यांची आपत्कालीन बैठक बोलावली. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खट्टर यांनी मुख्य सचिव, गृह सचिव, हरियाणाचे पोलीस  महासंचालक आणि वरिष्ठ अधिका-यांची आपत्कालीन बैठक बोलावली आहे, अशी माहिती एका अधिका-याने दिली.
राज्यात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे आवाहन मुख्यमंत्री खट्टर यांनी जनतेला आणि डेरा सच्चा सौदाच्या समर्थकांना केले आहे. स्थितीवर नियंत्रण  मिळवण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. जर कोणी जाळपोळ किंवा हिंसाचार पसरवत असेल तर, त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश  खट्टर यांनी प्रशासनाला दिले आहेत.