Breaking News

बलात्कार प्रकरणी राम रहिम यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 30 लाखांचा दंड

चंदीगढ, दि. 29, ऑगस्ट - डेरा प्रमुख राम रहिम यांना बलात्काराच्या दोन प्रकरणात 10-10 वर्षांची अशी एकूण 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा केंद्रीय अन्वेषण  विभागाच्या विशेष न्यायालयाने आज सुनावली आहे. या बरोबरच न्यायालयाने 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या पैकी दोन्ही पीडितांना प्रत्येकी 14 लाख  रुपये भरपाई देण्यात येईल व उर्वरित 2 लाख रुपये न्यायालयात जमा केले जातील.
राम रहिम यांच्या विरोधात दाखल बलात्काराच्या दोन प्रकरणात देण्यात आलेली तुरुंगवासाची शिक्षा एकामागोमाग एक अशी एकूण 20 वर्षांपर्यंत आहे, अशी माहिती  केंद्रीय अन्वेषण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिली.
न्यायालयाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल. हे प्रकरण 18 वर्षांपूर्वीचे असून या काळात राम रहिम यांच्यावर कोणताही दुसरा गुन्हा दाखल  झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाने नरमाईची भूमिका घ्यावी, अशी विनंती न्यायालयाला करण्यात येईल, असे राम रहिम यांचे वकील एस.के. गर्ग यांनी  सांगितले.