Breaking News

भोपाळ-उज्जैन रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरण : ‘एनआयए’कडून चार आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली, 09 . ऑगस्ट - भोपाळ-उज्जैन रेल्वे बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने मंगळवारी चार आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.  भोपाळ-उज्जैन रेल्वे बॉम्बस्फोटप्रकरणी भोपाळमधील एका न्यायालयाने तीन आरोपींना दोषी ठरवून 10 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. 15 मार्च  रोजी भोपाळ दहशतवादविरोधी पथकाने यासंबंधित कागदपत्रे तपास यंत्रणेकडे सोपवली होती. या प्रकरणामागे इसिस या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची माहिती  अद्यापही मिळाली नाही, असे भोपाळचे पोलीस महानिरीक्षक मकरंद देवस्का यांनी दिली.