Breaking News

’इसिस’ शी संबंध असल्याच्या संशयावरून 90 जणांना अटक

नवी दिल्ली, 09 . ऑगस्ट - ’इसिस’ शी संबंध असल्याच्या संशयावरून 90 जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि पोलिसांनी अटक केल्याचे आज केंद्रीय गृह  राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी लोकसभेत सांगितले.
तरुणांना आपल्या संघटनेमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी इसिस समाज माध्यमांचा वापर करत आहे. केंद्रीय आणि राज्य तपास यंत्रणांनी इसिसच्या संपर्कात  असलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवत त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी 90 जणांना अटक केल्याची माहिती हीर यांनी आज लोकसभेमध्ये लेखी उत्तरात  दिली.