Breaking News

पंतप्रधान मोदी यांच्या निमंत्रणानंतर ट्रम्प यांची कन्या नोव्हेंबरमध्ये भारतात येणार

नवी दिल्ली, 09 . ऑगस्ट - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प नोव्हेंबरमध्ये भारतात  येणार आहे. इवांका नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भारत दौ-यावर येणार असून हैदराबादमध्ये होणा-या जागतिक उद्योजकता शिखर परिषदेमध्ये त्या सहभागी  होणार आहेत. 
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या अमेरिकेच्या दौर्‍यादरम्यान इंवाका यांना या परिषेदत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. इवांका यांनी ट्विट करून मोदी यांचे  आभारही मानले होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 2010 मध्ये या परिषदेची सुरूवात केली होती. भारतात पहिल्यांदाच या परिषेदचे आयोजन  करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि आंध्र प्रदेश सरकारच्या मदतीने नीती आयोग या परिषदेचे आयोजन करणार आहे.