Breaking News

आंतरराष्ट्रीय वनस्पती नामकरण स्थायी समितीच्या सदस्यपदी डॉ. अरविंद धाबे यांची नियुक्ती

औरंगाबाद, दि. 08, ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय वनस्पती नामकरण स्थायी समितीवर सदस्य म्हणून डॉ. अरविंद शंकरराव धाबे ( विभागपमुख, वनस्पतीशास्त्र विभाग,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) यांची नियुक्ती करण्यात आली. शेनझेन चीन येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय वनस्पती नामकरण व  वनस्पतीशास्त्र परिषदेत प्रो. धाबे यांची नियुक्ती करण्यात आली. ’इंटरनॅशनल असोसीएशन फॉर प्लान्ट टॅक्सॉनॉमी’च्या (आय. ए. पी. टी.) अध्यक्षा डॉ. विकी फुंक  (अमेरीका) व महासचिव प्रो. डॉ. कॅरोल मारहोल्ड (स्लोव्हॉक रिपब्लीक) यांनी प्रो. धाबे यांची सहा वर्षासाठी नियुक्ती केली. पुढील वनस्पती नामकरण व  वनस्पतीशास्त्र परिषद जुलै, मध्ये रिओ डी जानीरो, ब्राझील येथे आयोजीत करण्यात आली आहे. प्रो. धाबे यांच्या नियुक्तीबद्दल कुलगुरु डॉ बी. ए. चोपडे, प्रभारी  अधिकारी डॉ वाल्मीक सरवदे आदिंनी डॉ धाबे यांचे अभिनंदन केले आहे.