Breaking News

बँड लावून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

हिंगोली, दि. 08, ऑगस्ट - तहसील कार्यालयाच्या आवारात अचानक बँडचा आवाज येवू लागल्याने सगळे बाहेर आले तर काय ते कोणते लग्न नव्हते तर चक्क स्वस्त  धान्य दुकानदार शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या दुकानदारांनी बँड लावून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत होते.
स्वस्त धान्य दुकानदारांना दरमहा 35 हजार मानधन द्यावे, ई-पॉसच्या अंमलबजावणीसाठी युनिट रजिस्टरप्रमाणे डाटा बेस दुरुस्ती करावी अशा अनेक मागण्यांसाठी  गेल्या काही दिवसांपासून अंदोलन चालले असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अशा प्रकारे आवज उठवला आहे.