Breaking News

हिमायतनगर तालुक्यात महिन्याभरात पाच ते सहा शेतक-यांच्या आत्महत्या

नांदेड, दि. 08, ऑगस्ट - हिमायतनगर तालुक्यातील भोंडानी तांडा येथील शेतकरी कबीर बाबुराव वय 20 वर्ष याने विषारी औषध प्राशन मृत्यूला कंटाळले आहे.  चालू व मागील महिन्यात मिळून हिमायतनगर तालुक्यातील पाच ते सहा शेतक-यांनी आत्महत्या केल्याची नोंद हिमायतनगर पोलीस दफ्तरी करण्यात आली आहे.  याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या तीन ते चार वर्षांपासून हिमायतनगर तालुका दुष्काळाच्या गर्तेत सापडला आहे. त्यामुळे अलपभूधारक शेतकरी कर्जाच्या  ओझाखाली आला असून, खरिपाच्या पेरण्यासाठी पैसे जवळ नसल्याने आत्महत्येकडे वळत आहे. मौजे वाई तांडा येथील युवा शेतकरी सचिन सुरेश पवार याने  सततची नापिकी व बैंकेच्या वाढत कर्जाच्या बोजा व बहिणेचे लग्न कसे करावे या विवंचनेत दि.05 जुलै रोजी विषारी औषध प्राशन केले, दरम्यान उपचार सुरु  असताना दि.13 जुलै रोजी त्याची प्राणज्योत मालवली. तसेच तालुक्यातील मौजे डोल्हारी येथील नितीन संजय कदम वय 22 वर्ष या नदीकाठावरील युवा  शेतक-याने बैंकेचे थकीत कर्ज आई शेतीची होत सलेले वारंवार नापिकीला कंटाळून दि.30 जुलै रोजी विष प्राशन केले. त्यास तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात  दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर तालुक्यातील बॉण्ड्सनी तांडा येथील विष्णू जाधव वय 32 वर्ष याने दि.01 ऑगस्ट रोजी बैंकेचे कर्ज कसे  फेडावे आणि सततची नापिकी या विवंचनेत विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविली. तर तालुक्यातील मौजे भोंडानी तांडा येथील कबीर बाबुराव वय 20 वर्ष  याने स्वतःच्या शेतात विषारी औषध प्राशन केले, त्यास नांदेड येथे उपचारकामी नेले असता त्याची प्राणज्योत मालवली. तसेच तालुक्यातील जवळगाव येथील एका  शेतक-याने कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली, मात्र याबाबत अद्याप हिमायतनगर पोलीस डायरीत नोंद झाली नसल्याने मयताचे  नाव समजू शकले नाही.