Breaking News

मोताळा नगर पंचायतीला समस्यांचे ग्रहण!

अनेक प्रभागांमध्ये घाणीचे साम्राज्य; न.प.अध्यक्षासह प्रशासनाचे विकास कामांकडे दूर्लक्ष

बुलडाणा, दि. 08 - गेल्या अनेक महिन्यापासून स्वच्छतेच्या बाबतीत मोताळा गावात विकास कामांचे तिन तेरा वाजले असून यामुळे मोताळा ग्रामपंचायतचे नगर पंचायतमध्ये रुपांतर झाल्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु तसे प्रत्यक्षात होतांना दिसत नाही. शहरात अनेक ठिकाणी अतिक्रण, रस्त्याावर गुर्‍या ढोर्‍यांचा सर्रास फिरतांना दिसतात तर गावातील अनेक प्रभागातील नाल्या तसेच नियमीतपणे स्वच्छता होत नाही. त्यामुळे आधीच पावसाळा असल्यामुळे घाणीमुळे अनेक प्रकारचे प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे नगर पंचायत मुख्याधिकारी तसेच अध्यक्ष यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 
नगर पंचायतमध्ये अनेक नागरिकांच्या समस्या निराकरण करण्यासाठी गेले असता त्याठिकाणी संबंधित अधिकारी तसेच मुख्याधिकारी पुर्ण हजर नसल्यामुळे नागरिकांचे प्रश्‍न प्रलंबित राहत असून यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामोरे जावे लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असून यामुळेे देखील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोताळा नगर पंचायत मध्ये जवळपास 17 प्रभाग यापैकी प्रभाग 4, प्रभाग 3, प्रभाग क्र 6  व प्रभाग क्र.10 मध्ये अतिशय घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे नागरिकांना रस्त्यावरून जाणे येणे सुध्दा मुश्कील झाले आहे.  यासंदर्भात नगर पंचायत ठोस कार्यवाही करतांना दिसत नाही यासंदर्भात अनेक नागरकांनी तक्रारी केल्या असता नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आली आहे. त्यामुळे मोताळा येथील जनता अतिशय नाराज असून नगर पंचायत झाल्यामुळे लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या परंतु विकासात्मक कोणत्याही प्रकारचे पाऊल नगर पंचायतच्या माध्यमातून उचलतांना दिसत नाही व मोताळा शहराचा विकास खुटला असून यासंदर्भात मुख्याधिकरी तसेच संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक प्रभागमध्ये  घाणीचे साम्राज्य असून नियमीतपणे साफसफाई तसेच इतर कामे करण्यात नगर पंचायतच्या प्रशासनाला अपयश आले असून नगरसेवक आपल्या मर्जीतील लोकांच्या समस्येेंकडे लक्ष देतात व इतर नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करतात या संदर्भात मुख्याधिकारी त्यांनी ठोस पाऊले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.  पावसाळ्या पूर्वीच नगर पंचायत वतीने कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊल उचलण्यात आले नसून  यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.  गावातील अनेक प्रभागामध्ये नाल्या, तसचे डबक्याचे पाणी साचत असून या पाण्याची विल्हेवाट करण्याची कोणतीच ठोस कार्यवाही मुख्याधिकारी तसेच संबधित कर्मचारी यानी केली नाही.त्यामुळे मोताळा येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तात्काळ रस्त्याची दुरुस्ती, तसेच नाल्याची घाण पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी मोताळा नागरिकांकडून करण्यात येत आहे.  त्यामुळे नागरिकांच्या प्रचंड रोषाला नगर सेवकांना सामोरे जावे लागत आहे. तसेच गावात अनेक प्रकारचे रस्ते तयार करण्यात आले असून हयाचे बांधकाम देखील अतिशय निकृष्ट दर्जाचे असून गेल्याा वर्षभरातच सदर रस्ता उखडला असून याची सखोेल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांकडून होत आहे.
नगर पंचायत मध्ये एखाद्या  नागरिक कोणत्याही प्रकारची तक्रार देण्यास गेला असता या ठिकाणचे कर्मचारी नागरिकांशी असभ्य भाषेत बोलतात तसेच अनेकवेळा अधिकारी व कर्मचारी नगर पंचायत मध्ये उपस्थित नसतात यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत. सर्व सामान्य जनेतला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे निदान कार्यालयीन वेळेत तरी पुर्ण कर्मचारी व संबंधित अधिकारी कार्यालयात हजर असणे गरजेच असून यामुळे नागरिकांच्या समस्या सोडविण्यास मदत होईल. अशी मागणी मोताळा येथील रहिवासी करत आहेत.
याबाबत मोताळा  नगर पंचायत गांभीर्याने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.तसेच नगर पंचायत मध्ये अनेक कत्राटदार म्हणून कर्मचारी देखील कार्यकरत आहेत ते नागरिकांचे निट बोलत नाहीत तसेच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करत सदर उध्दड कंत्राटदारांना समज देवून नागरिकांशी कसे बोलावे यावे समज देणे गरजेचे आहे.