Breaking News

टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा झाला रेकॉर्ड

नवी दिल्ली, दि. 08, ऑगस्ट - मोईन अलीच्या घातक गोलंदाजीमुळे इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला ओल्ड ट्रॅफर्डमध्ये चौथ्या आणि अंतीम टेस्ट मॅचमध्ये 177 धावांनी  पराभूत केले. यामुळे इंग्लंडने सिरीजवर 3-1 ने कब्जा केला. आफ्रिकेला आपल्या जमीनीवर नमवण्यासाठी इंग्लंडला 19 वर्ष वाट पाहावी लागली आहे. या  ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार ठरला ऑलराउंडर मोईन अली... या ऑलराऊंडर कामगिरीमुळे त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये एक खास कामगिरी करणारा क्रिकेटर बनला  आहे. 
मोईन अलीने असा रेकॉर्ड बनविले आहे, जे 2005 पासून कोणत्याही इंग्लंड क्रिकेटरला करता आलेले नाही.  दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सिरीजमध्ये मोईन अली याने  फलंदाजी करताना 200 पेक्षा अधिक धावा केल्या तर 20 विकेट पटकावल्या. 2005 नंतर इंग्लंडकडून करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे.  यापूर्वी अँड्र्यू  फ्लिटाँफ यांच्या नावावर हा विक्रम होता. त्याने 2005च्या अ‍ॅशेज सिरीजमध्ये 200 पेक्षा अधिक धावा केल्या आणि 20 विकेट घेतल्या होत्या.