Breaking News

चिकलठाणा एमआयडीसी परिसरात दोन हजार,पाचशेच्या बनावट नोटा

औरंगाबाद, दि. 22, ऑगस्ट - चिकलठाणा एमआयडीसी परिसरात आज दोन हजार आणि पाचशेच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. पाचशे आणि  दोन हजारच्या नोटा असल्याचे पाहून गावकरी गोळा करण्यास गेले मात्र या नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यांमुळे आज रिमझिम पावसाबरोबरच  बनावट नोटांचा पाऊस पडल्याचे दिसून येते. नुकतेच हिंगोलीत बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर या घटनेकडे गांभिर्याने बघण्यात  येत आहे.