Breaking News

वीज खांबांच्या तपासणी दरम्यान लाइनमनचा मृत्यू

बीड, दि. 22, ऑगस्ट - पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे वीज खांबांच्या तपासणी दरम्यान लाइनमन मृत्यू झाला आहे. बाबुराव शेळके असे  लाईटमनचे नाव असून वीजेच्या खांबाची तपासणी करतांना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. बाबुराव यांचा मृत्यू काम करताना झाला की  घातपातामुळे हे स्पष्ट झाले नसून पोलीस तपास करीत आहेत.