Breaking News

गणेश मंडळांनी रक्कम धर्मादाय रुग्णालयांच्या खत्यात जमा करावी - ईश्‍वर के. सूर्यवंशी

सातारा, दि. 24, ऑगस्ट - सातारा जिल्ह्यातील गणेश मंडळांनी त्यांच्याकडे जमा होणा-या वर्गणीच्या रक्कमेपैकी 10 टक्के रक्कम जिल्ह्यांत कार्यरत असलेल्या  धर्मादाय रुग्णालयांच्या आय.पी.एफ खत्यामध्ये जमा करावी व तसा लेखापरिक्षण अहवाल कार्यालयाकडे दाखल करावा असे आवाहन सातारा जिल्ह्याचे सहाय्यक  धर्मादाय आयुक्त ईश्‍वर के. सूर्यवंशी व श्रीमती प्रज्ञा सूर्यवंशी यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णांलयांची यादी कार्यालयातील नोटीस बोर्डवर दर्शनी भागात उपलब्ध आहे. तरी सर्व गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी  ओळखून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समोर येवून देशाच्या उन्नतीस हातभार लावावा व त्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवावेत असे आवाहनही केले आहे.