Breaking News

पतीच्या मदतीने लाच स्विकारणा-या महिला अधिका-यावर गुन्हा दाखल

नांदेड, दि. 24, ऑगस्ट - बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून काम केलेल्या लाचखोर महिला अधिकारी आणि तिच्या पतीविरोधात नांदेड येथे अपसंपदेचा गुन्हा  नोंदविण्यात आला आहे असून उत्पन्नापेक्षा जास्त त्यांनी 61 लाख रूपये बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याने त्याचा हिशोबही मागण्यात आला आहे.
उमरी येथे बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून शांता सुरेवाड या 2014 मध्ये कार्यरत होत्या़ तेंव्हा पतीच्या मदतीने लाच स्विकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक  पथकाने रंगेहाथ पकडले होते़ त्यांच्याविरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केलेल्या  चौकशीत शांत सुरेवाड यांनी 2000 ते 2014 या चार वर्षाच्या काळात पती व्यंकट मोगलाजी अनमुलवार यांच्या मदतीने 61 लाख 3 हजार 499 रुपये एवढी  बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचे निदर्शनास आले असून आत या दोघांविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़