नागपुरात संपर्क क्रांती रेल्वेचा अपघात थोडक्यात टळला
नागपूर, दि. 23, ऑगस्ट - हरिद्वार एक्स्प्रेसच्या अपघाताची घटना ताजी असतानाच मंगळवारी (22 ऑगस्ट) नागपुरातही तसाच प्रसंग ओढवला होता. तुटलेल्या रुळांवरून संपर्क क्रांती एक्स्प्रेस गेली. परंतु, सुदैवाने अपघात झाला नाही. नागपूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 वरून तुटलेल्या रुळांवरून संपर्कक्रांती एक्स्प्रेस रवाना झाली. या रेल्वेचे शेवटचे तीन डबे नेहमीपेक्षा जास्तच हालत असल्याचे प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या रेल्वे कर्मचार्याच्या लक्षात आले. त्याला शंका आल्याने त्याने पुढे जाऊन पाहिले असता रूळ तुटला असल्याचे आढळून आले. त्याने त्वरित याची माहिती स्थानक व संबंधित कर्मचार्यांना दिली. यानंतर लगेच दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. ही बाब कर्मचार्याच्या त्वरित निदर्शनास आली नसती तर प्रसंगी या रुळावरून जाणार्या इतर रेल्वे गाड्यांचा मोठा अपघात होण्याची शक्यता होती.
रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी 5.45 वाजता संपर्कक्रांती एक्स्प्रेस नागपूर स्थानकावरील फलाट क्रमांक 1 वरून रवाना होत होती. स्थानकाच्या इटारसी दिशेच्या टोकाकडे उभे असलेले दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळाचे वरिष्ठ टीटीई जीतेंद्र कुमार हत्थेल यांना संपर्कक्रांती एक्स्प्रेसचे मागचे डबे नेहमीपेक्षा जास्तच हालत असून उसळी घेत असल्याचे लक्षात आले.
रेल्वे जाताच हत्थेल यांनी रुळांची पाहणी केली असता त्यांना रूळ तुटला असल्याचे दिसून आले. हे पाहताच त्यांनी उपस्टेशन प्रबंधकांकडे धाव घेतली. तेथे रूळ तुटल्याची माहिती दिली. उपस्टेशन प्रबंधक राजू इंगले, प्रवीण रोकडे, अरुण श्रीवास्तव, आर.एस. तायडे यांनी लगेच हालचाली केल्या. काही वेळापूर्वीच अहमदाबाद एक्स्प्रेसला प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर येण्याचा सिग्नल देण्यात आला होता. इंगळे यांनी लगेच आऊटर डिप्टी एसएस ऑफिसला प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्याची सूचना दिली. कंट्रोल रुमलाही कळवले. श्रीवास्तव, तायडे यांनी मध्य रेल्वे नागपूर मंडळ प्रशासनालाही याची माहिती दिली. याची दखल घेऊन रेल्वे स्टाफ त्वरित घटनास्थळी पोहचला व दुरुस्तीचे काम सुरू केले. तासभरात रुळाची दुरुस्ती करण्यात आली.