Breaking News

भीम कॅशबॅक योजनेच्या अवधीत एक वर्षाची वाढ

नवी दिल्ली, दि. 23, ऑगस्ट - केंद्र सरकारने भीम कॅशबॅक योजनेचा अवधी मार्च 2018पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती  तंत्रज्ञान मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दुकानदार भीम कॅशबॅक योजनेचा लाभ 31 मार्च, 2018पर्यंत घेऊ शकणार आहेत. रोखविरहित  व्यवहारास चालना देण्यासाठी 14 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पचे उद्घाटन केले होते. या योजनेअंतर्गत दुकानदारांना पहिल्या 20 ते 50  व्यवहारांवर 50 रुपयांचे कॅशबॅक मिळते. त्यानंतर 950 रुपयांपर्यंतच्या प्रत्येक व्यवहारावर दोन रुपयांचे कॅशबॅक मिळते.
भीम कॅशबॅकची मासिक सीमा एक हजार रुपये इतकी आहे. या पमार्फत कॅशबॅक मिळवण्यासाठी दुकानदाराने किमान 20 वेळा या पचा वापर केलेला हवा  आणि प्रत्येक व्यवहार किमान 25 रुपयांचा हवा.